पुनः स्थापीत केलेल्या ILUG-D चा पहिला वर्धापन दिवस
पुनः स्थापीत केलेल्या ILUG-D चा पहिला वर्धापन दिवस
Indian Linux Users Group - Delhi ने काहीच दिवसांन अगोदर म्हणजेच ८ ऑक्टोबर ला त्यांचा पहिला वर्ष पूर्ण केला. हे दिवस ILUG-D ने एक छानसा meetup आयोजित करून साजरा केला. ILUG-D ने हे meetup पहिल्यांदाच एका शैक्षणिक संस्थानात आयोजित केले होते. शैक्षणिक संस्थानात आयोजित केल्या मुळे खुप सारे नवीन विद्यार्थी या meetup ला अपेक्षित होते. म्हणूनच आम्ही meetup मध्ये होणाऱ्या सगळ्या Talks/Workshops म्हणजेच होणारे संवाद आणि कार्यशाळा अश्या आयोजित केल्या जे कि नवीन विद्यार्थ्यानं समजतील.
आपण कार्यक्रमाची रूप रेषा बघुन सांगू शकाल कि हा meetup, Linux आणि सॉफ्टवेअर मध्ये असलेल्या मूळ संकल्पना समजण्या साठी उपयुक्त म्हणून आयोजित केला गेला होता. आम्ही हे कार्यक्रम LinuxChix India या मुलींना संगणक क्षेत्रात येण्या साठी सहाय करणाऱ्या समुहा सोबत मिळुन आयोजित केला होता.
ILUG-D म्हणजेच भारतीय लिनक्स वापरकर्ता समुह - दिल्ली हे समुह फार जुने असून वर्ष ला स्थापित झाले. त्या काळी भारतात असे फार कमी समुह होते जे मुक्त सॉफ्टवेअर आणि linux ला केंद्र स्थानी ठेवुन स्थापित केले गेले होते. अश्याच त्या काहीं पैकी ILUG-D एक समूह आहे. त्या काळी स्थापित झालेले अशेच बाकी समूह होते PLUG, ILUG -BOM, आणी ILUG -C, आज अशे खूप सारे समुह भारतात असून त्यांच्या पैकी काहींची यादी आपण http://fsug.in वर एका छानश्या नकाश्यात बघु शकता.
ILUG-D हे त्याच्या स्थापने नंतर जवळपास २०१३ काही कारणास्तव बंद पडला. काही वर्षां साठी दिल्ली मध्ये कोणताही linux किंवा मुक्त सॉफ्टवेअरशी निगडित समूह नव्हता. दिल्लीत काही programming च्या भाषांशी निगडित समुह या काळात निर्माण झालेत.पण मुक्त सॉफ्टवेअर विषयी बोलणारा कोणताच समूह दिल्लीत परत सुरु झाला नाही. पण मागच्या वर्षी २०१६ मध्ये एक योग आला. साधारण रित्या तंत्रज्ञानाशी निगडित संमेलन तशे पुर्व आणि दक्षिण भारतातच होतात. पण मागच्या वर्षी दिल्ली च्या PyDelhi समूहावर Python programming वर होणारा राष्ट्रीय सम्मेलन PyCon India २०१६ आयोजन करण्याची जबाबदारी पहिल्यांदाच आली. आणी PyDelhi समुहाने ती जबाबदारी अतिशय चांगल्या रित्या पार पण पाडली. आणी PyDelhi समूहा मध्येच असलेल्या काही लोकांना दिल्ल्लीत झालेल्या या संमेलन मुळे कळालं कि दिल्लीत तंत्रद्यान ला खूप वाव आहे. आणि सगळ्या प्रकारच्या मुक्त तंत्रज्ञानाशी निगडीत असलेला दिल्लीत कोणताच समूह नाही याची पण त्यांना उणीव भासली. हि उणिव भरून काढण्यासाठीच PyDelhi मध्येच असलेल्या काही जणांनी ILUG-D ची पुनर्रस्थापना केली.
ILUG-D च्या इतिहासा बद्दल खूप काही लिहल्या जाउ शकते, पण या blog post ला मी ८ ऑक्टोबर ला झालेल्या meetup पर्यंत मर्यादित ठेवणार. ILUG-D विषयी आणखी सखोल पणे सांगेल पण एखाद्या वेगळ्या post मध्ये कधी तरी नंतर.
ILUG-D समुहाने १ वर्ष पूर्ण करण्याचा हा क्षण, नवीन विद्यार्थ्यांना समजेल असे talks आणी workshops आयोजीत करून आणि छानसा Cake कापून साजरा केला. याला उपस्थित विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद लाभला.
या meetup मध्ये खुप सारे विद्यार्थी उपस्थित होते. हे आपण या काही चित्रां मध्ये बघु शकता
अनुव्रत “Software Development on Linux” या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांशी बोलतांना
शिवानी “Basics to Shell” या विषयावर कुंतल च्या जागी बोलताना.
मी स्वतः “Overview of Applications and GUI in Linux” या विषयावर बोलतांना.
Meetup मधले आणखी काही चित्र.
आणी meetup च्या अखेरच्या टप्यात आम्ही ILUG -D च्या सगळ्या सदस्यांनी आणी उपस्थित विद्यार्थ्यानी Cake कापुन हा दिवस साजरा केला.